एकलहरे बेलापूर येथे सशस्त्र दरोडा . एकाची हत्या

एकलहरे बेलापूर येथे सशस्त्र दरोडा . एकाची हत्या

 बेलापूर ते ऊकलगाव रोडवर असलेल्या नईम जहागीरदार शेख यांच्या घरी रात्री दिड च्या सुमारास त्यांची पत्नी लघू शंकेसाठी घराबाहेरील शौचालयाकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच दडून बसलेले चार पूरुष व एक महिला दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला व जबर जखमी करुन घरात ओढून नेले. त्याच वेळी आवाजने जागे  झालेल्या नईम यांना झोकयाच्या दोरीने गळा आवळून हत्या करून घरातील ४ ते ५ लाख रुपये घेऊन पोबारा केला .जखमी पत्नीने जवळच राहत असलेल्या वडिलांना कळविल्यावर सर्वजण मदतीला आले परंतु तो पर्यंत नईम यांचा मृत्यु झाला होता .

   कालच नईम यांनी एका व्यव्हारासाठी पतसंस्थेतुन मोठी रक्कम काढून आणली होती हि माहिती बहूतेक दरोडेखोरांना असावी त्यामूळे हल्लेखोर स्थानिक असावेत अशी चर्चा गावात आहे .आणी हल्लेखोराला नईम ने ओळखले असावे म्हणूनच त्यांना जीवे मारण्यात आले असावे .

 अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस यंत्रणेकडून कसून तपास चालू आहे.